Welcome to Maza Naukarinama Blog*** माझा नौकरीनामा ब्लॉग मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे
सदर अनुदिनी (ब्लॉग) शासकीय नसून संपूर्णपणे खाजगी ब्लॉग आहे ......१.शासकीय ,निमशासकीय सेवेत कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध शासकीय अधिनियमे ,नियमे, शासन निर्णय ,परिपत्रके यांच्यातील तरतुदी व इतर अनुषंघिक माहिती साध्या सोप्या भाषेत एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे.... २. सदर ब्लॉग वर अधिकाअधिक अचूक माहिती उपलब्ध करून देण्याचा आमचा कायम प्रयत्न असला तरीही उपलब्ध माहिती अगदी अचूक असल्याचा दावा आम्ही करीत नाही त्यामुळे वापरकर्त्याने माहितीची स्वतः शहानिशा करावी तसेच कायदेशीर बाबींसाठी अधिकृत शासकीय माहितीचा वापर करावा ..... ३.सदर ब्लॉग वर उपलब्ध लेख /तयार करण्यात आलेली माहिती जशीच्या तशी कॉपी करून इतर दुसऱ्या ठिकाणी प्रसिध्द करता येणार नाही ..... ४.ह्या ब्लॉगची कोणत्याही शासकीय /निमशासकीय कर्मचाऱ्यास त्याच्या कामकाजात थोडीजरी मदत झाली तरी हा ब्लॉग बनविण्याचा उद्देश सफल होईल ...

Friday, August 21, 2020

रजा माहिती भाग ३...... प्रसूती रजा (Pregnancy Leave)

 रजा माहिती भाग ३...... प्रसूती  रजा (Pregnancy Leave)

         मागील लेखात आपण वैद्यकीय रजेंच्या संदर्भात  माहिती पहिली.अत्यंत कमी शब्दात जास्तीत जास्त  माहिती आपल्या पर्यंत पोहचविणे हाच आमचा हेतू असतो . अनावधानाने एखादी बाब राहून गेली तर ती माहिती लेखात पुन्हा Update करण्यात येते,काही  दिवसांनी तोच लेख पुन्हा वाचल्यास  Updated Information सुद्धा उपलब्ध होऊ शकते त्यामुळे माझा नौकरीनामा  ब्लॉग ला नियमित भेट देत  रहा.आजच्या ह्या भागात आपण प्रसूती  रजेबद्दल माहिती पाहुया ......  

प्रसूती रजा (Pregnancy Leave) बद्दल काय आहे प्रायोजन ?

              सेवेत नव्याने रुजू झालेल्या महिला शासकीय /निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे प्रसूती रजा .प्रसूती रजेच्या माहितीच्या अभावामुळे बऱ्याच महिला कर्मचारी अगदी प्रसूतीच्या  आदल्या दिवसा  पर्यंत सुद्धा कामावर हजर असतात प्रसंगी त्यांना बऱ्याच आरोग्य विषयक समस्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे नियम वेळीच माहिती करून घेणे आवश्यक असते.

 महाराष्ट्र नागरी सेवा (रजा )नियम १९८१ च्या नियम ७४ मध्ये विहित केलेल्या शर्तीच्या अधीन राहून महिला शासकीय कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा मंजूर करण्यात येते. कुटुंब लहान व मर्यादित ठेवण्याच्या उपाययोजनेची केंद्र सरकारने केंद्रीय नागरी सेवा (रजा )नियम १९७२ मधील प्रसूती रजेंच्या तरतुदींमध्ये सुधारणा केल्या त्यामुळे राज्य सरकारनेही २०१६ साली महाराष्ट्र नागरी सेवा (रजा )नियम १९८१ च्या प्रसूती रजेंच्या तरतुदींमध्ये बदल केला आहे. ते पुढीलप्रमाणे आहेत . 

अ . प्रसूती रजेचा अर्ज केल्याच्या तारखेस दोन किंवा दोन पेक्षा कमी हयात मुले असलेल्या कायम सेवेतील, कायम सेवेत नसलेल्या व कमीत कमी १ वर्ष सतत सेवेत असलेल्या त्याचप्रमाणे ३३ महिन्यांची सतत सेवा केलेल्या  कार्यव्ययी आस्थापनेवरील किंवा उक्त्या दराने अथवा रोजंदारीने परिश्रमिक देण्यात येण्याऱ्या महिला शासकीय कर्मचाऱ्याना  सक्षम प्राधिकारी रजा सुरु झाल्याच्या तारखेपासून १८० दिवसांच्या कालावधी इतकी प्रसूती रजा मंजूर करू शकेल. 

ब . महिला शासकीय कर्मचाऱ्याने  मागणी केल्यास प्रसूती प्रसूती रजेला जोडून वैद्यकीय प्रमाणपत्र ना सादर करता कमाल एक वर्षाच्या कालावधी पर्यंत (ह्यात ६० दिवसांपर्यंत परिवर्तित रजा किंवा अनर्जित रजा धरून ) देय  व अनुज्ञेय रजा घेण्यात परवानगी देता येईल . 

क .गर्भपात ,गर्भस्राव आणि गर्भसमापन अधिनियम १९७१ अन्वये घडवून आणलेला गर्भपात ,त्यांच्या बाबतीत महिला शासकीय कर्मचाऱ्यांना तिच्या संपूर्ण सेवेच्या कालावधी मध्ये कमाल ४५ दिवस इतकी प्रसूती रजा अनुज्ञेय राहील. (किती मुले हयात आहेत हे विचारात न घेता )

ड.गर्भपात इ . कारणास्तव महिला शासकीय कर्मचाऱ्यास विश्रांतीसाठी जास्त कालावधी ची आवश्यकता असेल तर देय व अनुज्ञेय रजा मंजूर करून अनुपस्थितीचा कालावधी नियमित करता येईल . 

इ.गर्भपात इ .कारणास्तव प्रसूती रजा मंजूर करतांना पूर्वी उपभोगण्यास आलेली अश्या प्रकारची प्रसूती रजा विचारात घेण्यात येऊ नये . 

प्रसूती रजे संदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय /परिपत्रक 

. प्रसूती रजा संदर्भात सेवा कालावधीची अट वगळण्याबाबत 

. प्रसूती रजेच्या विद्यमान तरतुदींमध्ये सुधारणा आणि मुलं दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना देय व अनुज्ञेय रजा 

1 comment: