माझा नौकरीनामा ब्लॉग वर आपले हार्दिक स्वागत .......
कर्मचारी कोणताही असो शासकीय किंवा निमशासकीय ,सेवा बजावत असतांना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो .येणाऱ्या बऱ्याच अडचणी ह्या माहितीच्या अभावामुळे निर्माण झालेल्या असतात .सेवा विषयक बरेच नियम कायदे राज्यात अस्तित्वात आहेत ज्याची वेळीच माहिती असली कि कामे अगदी चुटकी सरशी होतात.सर्व नियम,अधिनियम,शासन निर्णय,परिपत्रके हे वेळेवर उपलब्ध होतीलच असे नाही त्यांची शोधाशोध हि फार मोठी डोकेदुखी ठरते ,त्यामुळेच अशा सर्व माहितीचा अभ्यास करून अगदी साध्या सोप्या भाषेत विश्लेषित माहिती आपल्या समोर ठेवण्याचा मानस होता.सदर ब्लॉग च्या माध्यमातून तो पूर्ण करण्याचा छोटासा प्रयत्न खास आपल्या सारख्या मित्रांसाठी ......