रजा माहिती भाग २ ...... वैद्यकीय रजा (Medical Leave)
मित्रांनो मागील लेखात आपण रजेंच्या संदर्भात काही प्राथमिक माहिती पहिली.रजा आपला हक्क आहे कि नाही ,रजेंचे विविध प्रकार ,त्यांचा हिशोब आदी बाबी आपण त्यात पहिल्या.अत्यंत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती आपल्या पर्यंत पोहचविणे हाच आमचा हेतू असतो . अनावधानाने एखादी बाब राहून गेली तर ती माहिती लेखात पुन्हा Update करण्यात येते,काही दिवसांनी तोच लेख पुन्हा वाचल्यास Updated Information सुद्धा उपलब्ध होऊ शकते त्यामुळे माझा नौकरीनामा ब्लॉग ला नियमित भेट देत रहा.आजच्या ह्या भागात आपण वैद्यकीय रजेबद्दल माहिती पाहुया ......
वैद्यकीय रजा (Medical Leave)
"आजारपण सांगून येत नाही" असे म्हणतात हे जरी खरे असले तरी ते प्रत्येकाच्या वाट्याला कधी तरी येतेच ,मग ते खरे असो कि खोटे त्यामुळे वैद्यकीय रजेंची गरज संपूर्ण सेवा कालावधीत कधीतरी पडतेच .ह्या रजेसंदर्भात बऱ्याच बाबी माहित नसल्याने प्रसंगी गोंधळ उडतो त्यामुळे वेळीच माहिती करून घेणे क्रमप्राप्त ठरते. वैद्यकीय कारणा -स्तव जेव्हा कोणतीही रजा घेतली जाते तेव्हा ती रजा वैद्यकीय रजा (Vaidyakiya Raja) अशी संबोधल्या जाते.
कर्मचाऱ्याने वैद्यकीय रजा घेतांना घ्यावयाची काळजी.....
अराज्यपत्रित शासकीय कर्मचाऱ्याने वैद्यकीय कारणास्तव रजेवर जायचे असल्यास तो एकतर आधीच रजा मंजूर करून किंवा रजा मंजूर न करताही साधा अर्ज देवून रजेवर जाऊ शकतो परंतु सदर रजेच्या पुष्टयर्थ त्याने प्राधिकृत वैद्यकीय अधिकारी किंवा नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाचे (Registered Medical Practitioner Doctor) खाली दर्शविल्याप्रमाणे परिशिष्ट -पाच मधील नमुना ४ मध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत जोडले पाहिजे आणि त्यात आजाराचे स्वरूप व संभाव्य कालावधी शक्यतो स्पष्टपणे नमूद केलेला असला पाहिजे. शक्यतोवर याच नमुन्याचा वापर करण्यात यावा .या प्रमाणपत्रात नमूद केलेली कोणतीही शिफारस शासकीय कर्मचाऱ्याला अनुज्ञेय नसलेली कोणतीही रजा मागण्यासाठी पुरावा ठरू शकत नाही तसेच शासकीय कर्मचाऱ्याला एखाद्या ठिकाणाहून किंवा विशिष्ट ठिकाणी जाण्याची गरज आहे किंवा विशिष्ट ठिकाणी जाण्यास तो असमर्थ असे प्रमाणन अधिकाऱ्यास करता येत नाही .
कर्मचाऱ्याने वैद्यकीय रजेवरून परत येतांना घ्यावयाची काळजी .....
अराज्यपत्रित शासकीय कर्मचाऱ्याने वैद्यकीय कारणास्तव रजा उपभोगल्यानंतर कामावर परत येतांना पुन्हा कामावर रुजू होण्यासंदर्भात साध्या कागदावर अर्ज करावा त्या सोबत खालिल नमुन्यात दर्शविल्याप्रमाणे वैद्यकीय स्वास्थ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे . .सदर प्रमाणपत्र देणाऱ्या प्राधिकाऱ्यापुढे ,संबंधित प्रकरणात प्रारंभी ज्यावरून रजा मंजूर करण्यात आली किंवा वाढविण्यात आली आहे असे मूळ प्रमाणपत्र प्रस्तुत करण्यात येतील
शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कारणास्तव रजा मंजुरी .....
१-अराज्यपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांने वैद्यकीय कारणास्तव रजेकरिता अर्ज करतांना सोबत प्राधिकृत वैद्यकीय अधिकारी किंवा नोंदणीकृत वैद्यक व्यवसायीने दिलेले वैद्यकीय UNFIT Certificate जोडले पाहिजे.
२. सदर प्रमाणपत्रात कर्मचाऱ्याला असलेल्या आजाराबाबत,त्याच्या स्वरूपाबाबत व त्याचा संभाव्य कालावधी शक्यतो स्पष्ट नमूद केलेला असावा.
३. संबंधित शासकीय कर्मचारी त्याच्या कामावर पुन्हा रुजू होण्यास कधीच पात्र ठरणार नाही अशी वाजवी शक्यता दिसत असेल अश्या प्रकरणामध्ये ,वैद्यकीय अधिकारी रजा मंजूर करण्याची शिफारस करणार नाही आणि तो कर्मचारी शासकीय सेवेकरिता कायमचा अपात्र आहे असे मत वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये नमूद करेल .
४.अर्जदार ज्या कार्यालयामध्ये कार्यरत असेल त्या आस्थापनेच्या कार्यालयप्रमुख यांना कळविल्याशिवाय कोणतेही प्रमाणपत्र प्रतिवेदन अधिकाऱ्याकडे /क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे प्रतिस्वाक्षरी करिता सादर करता कामा नये.
५. रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी स्वेच्छानिर्णयानुसार ,जिल्हा शल्यचिकित्सका पेक्षा कमी दर्जा नसेल अश्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याला अर्जदाराची शक्य तितक्या लवकर वैद्यकीय तपासणी करण्याची विंनती करून दुसरे वैद्यकीय मत मिळवता येते.
६.कर्मचाऱ्याच्या आजारासंबंधी वस्तुस्थिती तसेच शिफारस केलेल्या राजेंची आवश्यक्यता या दोन्ही संबंधातील आपले मत व्यक्त करणे हे,शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कर्तव्य असते. त्या करीत तो अधिकारी आपल्या समोर किंवा त्याने नामनिर्देशित केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्या समोर उपस्थित राहण्यास संबंधित अर्जदाराला भाग पडू शकते.
७. वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यामुळे संबंधित शासकीय कर्मचाऱ्याला रजेबाबत कोणताही अधिकार प्राप्त होत नाही ,असे प्रमाणपत्र रजा मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्याकडे पाठविल्यानंतर त्याची वस्तुनिष्ठता तपासून सदर अधिकाऱ्याने सदर रजा मंजूर करावी किंवा नाही हा त्याचा स्वेच्छाधिकार असतो.
८.वर्ग ४ कर्मचाऱ्याच्या बाबतीत रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी अश्या कर्मचाऱ्याने वैद्यकीय कारणास्तव केलेल्या रजेंच्या किंवा रजा वाढीच्या अर्जाच्या पुष्ट्यर्थ ,त्या वाटेल असे प्रमाणपत्र स्वीकारू शकेल.
Nice
ReplyDelete